Friday, May 08, 2009

आता जागलं पाहिजे

आता कंटाळा खूप झाला
कामाला लागलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

मला जमत नाही म्हणून
आता चिडायचं नाही
माझं कसं होईल असं
म्हणत कुढायचं नाही
.
कमकुवत शब्दांना
पुरून टाकलं पाहिजे
.
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

येत नाही तिथे
प्रयत्न करीन म्हणायचं
सर्व अडचणींना
अगदी पुरून उरायचं
.
दुर्दम्य आशावाद
घेऊन जगलं पाहिजे
.
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

No comments: