Tuesday, October 31, 2006

'गांधीगिरी'ला की 'सावरकरगिरी' ला ?

नमस्कार


,

गांधीजींची मते


(सत्याग्रह, अहिंसा इ.) देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या माध्यमांतर्फे पोहचली. पण मला खटकते की त्यामानाने टिळक, सावरकरांची मते लोकांपर्यंत पोहचली नाहीत किंवा ती जवळ-जवळ महाराष्ट्रापर्यंतच मर्यादीत राहीली. माझ्या मते हे खुपच परस्परविरोधी आहे . एकीकडे सावरकरांना पुजायचे आणि दुसरीकडे 'गांधीगिरी'चे कौतुक करायचे . सावरकरांची मते गांधीच्या विरोधी होती. उदा.


. भारतवासीयांनो शत्रुवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा (गांधी ) वि. शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही (सावरकर )


. अहिंसेचा मार्ग स्विकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा वि . स्वरक्षण करणे हिंसा नव्हे. मुर्ख हिंदूनो एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही.


. मी पण एक हिंदु आहे. हिंदुचे सर्व देव शांतीचा संदेश देतात वि . तुम्ही पोकळ हिंदु आहात. श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे आणि श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र. सज्जनांच्या रक्षणाकरता देवांनाही हातात शस्त्र घ्यावी लागतात.


. हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रुशी लढायचे असेल तर त्यांच्या तत्त्वांशी लढा वि . युद्धात तत्त्वे नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा ह्या फक्त तलवारीने आखता येतात तत्त्वांनी नव्हे .


. तलवारीने नको हृदयपरिवर्तना वर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका . वि. ज्याने आपल्याला मारायचे ठरविले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदुनो अफजलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही हृदय फोडावे लागते .


. (गांधीना उद्देशून) तुमच्याच आहारी जाऊन हिंदू एवढे हीन झाले आहेत की त्यांना त्यांच्या बायका मुलांचे रक्षण पण करू नये ही फार शरमेची गोष्ट आहे . माझे मत असे आहे की : - गांधीगिरी + सावरकरगिरी करावी


गांधीगिरी व सावरकरगिरी हे दोन्ही दोन टोके वाटतात.

एक टोक अती थंड, संथ, अहिंसेचा अतिरेक तर दुसरे टोक उष्ण, जहाल मातावादी वाटते. परिस्थिती नुसार वागणे जास्त शहाणपणाचे वाटते.

उदा: एखादा मनुष्य जर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या स्त्रीची अब्रू लुटत असेल तर:

गांधीगीरीचा वापर करून शांत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. जर गांधीगीरीचा उपयोग होत नसेल तर सावरकरगिरी जरूर वापरावी. श्री रामाने सुद्धा रावणाला युद्धा पूर्वी शरणयेण्यास मुदत दिली होती. श्री कृष्णाने युद्धा पूर्वी शांतिदूताची भूमिका धेतली होती. म्हणजे, सावरकरगिरी पूर्वी गांधीगिरी करण्यास हरकत नाही. पण गांधीगिरी किती वेळ करावी याला मर्यादा असावी.



पण गांधीगिरी करताना ही गोश्ट मात्र लक्शात ठेवावी

आपल्या आदरणीय राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे, "क्षमा बलवानालाच शोभून दिसते. दुबळ्यांच्या क्षमेला काहीच अर्थ नसतो." कारण दुबळा फक्त क्षमाच करू शकतो. त्यामुळे आधी बलवान व्हावे. आपणही समोरच्याला शिक्षा देऊ शकतो एवढा धाक त्याच्या मनात निर्माण करावा मगच त्याला क्षमा करावी. मला वाटते हीच सावरकरांची भूमिका आहे. सर्व संतांचीही हीच भूमिका होती. तुकाराम महाराज म्हणतात "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी." "समर्थ" रामदासांनी गावोगाव मारुती मंदिरे स्थापन करून बलोपासनेला प्रोत्साहन दिले. मध्वाचार्यांनी सुद्धा ईश्वरपूजने इतकीच बलोपासना श्रेष्ठ मानली आणि आपल्या शिष्यांमध्ये ती रुजवली.





- सावरकरांची ही मते वाचून अजूनही आपण 'गांधीगिरी'वर विश्वास ठेवता काय ?


-


आपण कोणाला मानता ? 'गांधीगिरी'ला की 'सावरकरगिरी' ला ?

आपल्या पतिसादांची आपेक्शा आहे

1 comment:

सुधीर हर्डीकर said...

अमृत
आम्ही नाही भांडत गांधींना
किंवा सावरकरांना शिव्या देऊन
आम्ही पाहतॊय दॊघांच्याही
विचारांचे मंथन करून

जे चांगले असेल ते घ्या
वाईट असेल ते सॊडून द्या
गांधी असॊत किंवा सावरकर
कॊणीही सर्वगुण संपन्न असत नाही
चुका केल्याशिवाय माणूसपण शाबीत हॊत नाही

एकांगी विचार करणार नाही
चर्चा केल्याशिवाय राहणार नाही

काय चूक काय बरॊबर
ठरवू आम्ही आमच्यापुरते
माहीत आहे आम्हालाही
समुद्रमंथनाशिवाय अमृत हाती लागत नाही

विचारांच्या या समुद्रमंथनातून अमृत मिळवण्यासाठी
कॊणालातरी भॊलेनाथ हॊऊन हे हलाहल पचवावे लागणार

टीका हॊते म्हणून आम्ही आमचे विचारमंथन थांबवणार नाही
टीकेचे हलाहल पचवून अमृत मिळवल्याशिवाय राहणार नाही...
Sudhir