Friday, October 30, 2009

मनं शुध्द तुझं..




मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची


गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर - मा. परशुराम
चित्रपट - कुंकू (१९३७)

No comments: